(वालचंदच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेनंतर संमिश्र प्रतिक्रिया)
एव्हाना तुम्ही माझ्या ब्लॉग्स मधील पात्र आणि लेखन शैलीला
परिचित झाला असाल अशी अपेक्षा आहे आणि कदाचित झाला नसाल तर या वालचंद विशेषांकातील
मागील २ भाग वाचून तुम्ही परिचित व्हावं असा विनंतीवजा हट्ट मी करत आहे .
पार्श्वभूमी- परीक्षा म्हणजे एक मोठं दडपण
. काहींना ते खूप चांगलं पेलता येतं, तर काहींना
काही केल्या पेलत नाही
. परीक्षा कोणत्या विषयाची ह्यावरहि तश्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
आयुष्य म्हणजे तसं पाहायला गेलं तर एक मोठी परीक्षाच , नाही
का ? २ पेपर मधलं अंतर फक्त कधी काही वर्षांचं
, कधी काही दशकांचं तर कधी काही पर्वांचं. महाविद्यालयीन जीवनात येऊ पर्यंत तश्या अनेक
परीक्षाना तोंड दिलं पण वालचंद महाविद्यालयाच्या
यांत्रिकी विभागाच्या द्वितीय वर्षात गेल्या गेल्या ज्या परीक्षेला तोंड दिलं ते थोडं
भयावह होतं. यांत्रिकी
विभागाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश म्हणजे खऱ्या अर्थानं इंजिनीरिंग ची सुरुवात असं
म्हणायला काही हरकत नाही. अश्या सुरुवातीच्या
काळात परीक्षेचा हादरा काहींना सौम्य वाटला तर काहीना अगदी त्सुनामी सारखा धडकला .
परीक्षा सम्पल्यानंतरच्या काळात लिहिलेली हि बातमी म्हणजे शिक्षकांवर काढलेला रागच
असं त्यावेळी वाटायचं पण आज एक चांगला अनुभव / आठवण वाटते.
(खुलासा - या लेखातून कोणत्याही शिक्षक अथवा विद्यार्थाना
मानसिक हानी पोचवण्याचा कोणताही हेतु नाही . लेखातील काही शब्द त्याची रंजकता वाढवण्यासाठी
वापरले आहेत.)
सांगली(दि. ७ ऑक्टोबर २०१३) - येथील
वालचंद महाविद्यालयात नुकत्याच दिनांक ३ ऑक्टोबर २०१३ रोजी सुरु झालेल्या परीक्षा किंचित
उत्साहात आणि प्रचंड निराशेत पार पडल्या . महाविद्यालयातील परीक्षातज्ज्ञांच्या झालेल्या
सभेत मिळालेल्या माहितीनुसार आणि यांत्रिकी विभागाच्या विविध स्तरातील विद्यार्थ्यांच्या
रंगलेल्या चर्चा यातून एकंदर असे आढळून आले कि , परीक्षा या एकंदर संमिश्र स्वरूपाच्या
होत्या.
अवघड स्वरूपाच्या
परीक्षा म्हणजे वालचंद महाविद्यालयाच्या परंपरेचा एक भाग आहे. असे यांत्रिकी विभागाचे
परीक्षा तज्ज्ञ श्री. परांजपे (सर) यांचे परखड मत आहे . या मतानंतर विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये
भीतीचे सावट पसरले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या
काही गटांनी या मताचा विविध स्तरातून निषेध केला. तसेच यांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या विविध सभेतही अवघड परीक्षा प्रेमी शिक्षकांवर टीकास्त्रें
सोडण्यात आली . दरम्यान
सध्या यांत्रिकी विभागाचा चेहरा मोहरा समजले जाणारे शिक्षक श्री. मुल्ला (सर) यांनी
सोपी प्रश्नपत्रिका नियोजित केल्यामुळे व विद्यार्थ्यांना संबंधित विषयामध्ये मिळालेल्या
भरघोस यशामुळे प्रत्येक सामान्य विद्यार्थ्यांचा मनात प्रस्तुत शिक्षकांविषयी आदराची
भावना निर्माण झाली आहे. श्री.मुल्ला (सर) यांच्यावर अनेक विद्यार्थ्यांनी स्तुतीसुमने
उधळली असून सदरचा शिक्षक हा अल्पावधीतच " सामान्य विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत
" म्हणून नावारूपास आला आहे.
दैनिक वालचंद
ने विद्यार्थ्यांच्या विविध गटाशी या निमित्त संपर्क साधला. यांत्रिकी विभागाच्या एका
गटाचे प्रवक्ते व सध्या नैराशेने ग्रासलेले श्री. शेखर कुलकर्णी (अध्यात्मवादाचे दुसरे
नाव) दैनिक वालचंद शी बोलताना म्हणाले , " माझी परिस्थिती काही दिवसापासून खूप
दयनीय झाली आहे. प्रामुख्याने सांगावयाचे झाल्यास "पदार्थांचे सामर्थ्य
"(Mechanics of Material )
या विषयात माझे पूर्णपणे वस्त्रहरण झाले आहे असं मला वाटतं.( विषयात मिळालेले गुण- २० पैकी ३ ). सदरच्या विषयातील अपयशामुळे मला नाहक त्रास पोहोचला
आहे . माझ्या अश्या परिस्थितीस जबाबदार शिक्षकांना मी धोक्याचा इशारा देत आहे . सदरच्या
घटनेने माझी विभागाच्या राजकारणातील पत ढासळली आहे . "
यांत्रिकी
विभागाचे सर्वेसर्वा श्री. सौरभ सावंत (पाटील ) - अध्यक्ष , म.रा.प.म. यांनी ,दैनिक
वालचंद शी बोलताना दिलेली अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया " परीक्षेबद्दल सांगायचे झाल्यास
जर परीक्षा अवघड असेल तर सर्वानाच गुण कमी पडतील आणि जर सोपी असेल तर सर्वानाच जास्त
गुण मिळतील . परीक्षेच्या वेळापत्रकामुळे माझी नेहमीची बस चुकेल अशी शंका माझ्या मनात
उपस्थित होती पण तरीही ओंकार मालवणकर सारख्या गाडी असणाऱ्या समाजसुधारक मित्रांच्या
मदतीमुळे मला लवकर घरी पोचायला मदत झाली . "
संमिश्र स्वरूपांच्या या परीक्षांचे पडसाद विविध क्षेत्रात उमटताना दिसून आले. विद्यार्थी रातोरात चहाटपरी ऐवजी ग्रंथालयात गर्दी करताना दिसले . तसेच महाविद्यालय परिसरातील book store , xerox shops यांचा खप आश्चर्यकारक वाढल्याचे निदर्शनास आले .
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत ,
क्ष

I had got 4 marks in mid term 1. I studied so hard and got 2 in mid term 2😑.
ReplyDeleteMy only dream that time was to pass that subject. Around that time i was dating a girl, was going on a 3rd date with her before ESE, you know what happens on 3rd date 😅
Before that date i just had a thought that if i went on that date, i would fail in MOM.
I didn't go on that date, never met that girl after that.
And i passed the exam. Superstitious i was and lucky also.
Yes I had witnessed that closely. 😂😂 i also remember your failed efforts you made to join class outside college.
DeleteThanks Vishal !
ReplyDelete