Saturday, May 23, 2020

MESA- Non MESA वाद उफाळला

MESA, Non-MESA वाद उफाळला; दोन गटात धुमश्चक्री.

(Non-MESA कार्यकर्त्यांकडून MESA च्या TSD ला मारहाण )  

आज पुन्हा एक नवीन बातमी घेऊन तुम्हा सर्वांच्या भेटीला येतोय . मागील ब्लॉग च्या प्रतिक्रियांमधून असं लक्षात आलं कि , बातमीच्या आधी  थोडी पार्श्वभूमी देणं गरजेचं आहे . त्यानुसार या ब्लॉग मध्ये थोडासा बदल करत आहे .

पार्श्वभूमी - कोणत्याही कॉलेज मध्ये विविध प्रकारचे ग्रुप्स असतात . ग्रुप्स विना कॉलेज म्हणजे मिठाविना जेवण . मीठ चवीनुसार/स्वादानुसार घ्यावं असं म्हणतात, तसंच कॉलेज मध्ये सम स्वाद असणाऱ्या लोकांचे ग्रुप बनलेले असतात. अशाच सम स्वाद असणाऱ्या लोकांचे वालचंद महाविद्यालयात आमच्या वर्गात पण प्रामुख्याने ग्रुप होते. MESA आणि  NonMESA. MESA अर्थातच Mechanical Engineering Student Association आणि या व्यतिरिक्त इतर सर्व लोक म्हणजे   Non MESA . ह्या दोन गटांमधला मुख्य फरक थोडक्यात सांगायचा झाला तर  MESA हा ग्रुप म्हणजे महाविद्यालयात घडणारे अनेक तांत्रिक /अतांत्रिक  (Technical /Non -Technical ) कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सक्रिय असणारा एक गट  आणि अशा आयोजनात अथवा प्रयोजनात मुळात रस नसलेला पण इतर कशात तरी सक्रिय असा गट  म्हणजे Non-MESA . ह्या दोन संकल्पना फक्त ह्या बातमीला थोडं मसालेदार बनवण्यासाठी वापरण्यात आल्या असून, कोणत्याही   ग्रुपला  एकमेकांपेक्षा श्रेष्ठ किंवा  कनिष्ठ ठरवण्याचा हेतू नाही.

 

वृत्तात वापरलेल्या काही संदर्भांचं स्पष्टीकरण-

Assistant Board- हा एक द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहकारी MESA गट जो प्रमुख गट अर्थात तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध technical /non - technical कार्यक्रमांच्या आयोजनात मदत करत असतो

GIM(General Interest Meet) – हि एक प्रथम वर्ष यांत्रिकी विभागात प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सभा असते , ज्यात या नवयुवकांना महाविद्यालयाच्या वातावरणाशी मिळतं जुळतं करून घेण्यासाठी विविध उपक्रम घेतले  जातात  . हे उपक्रम प्रामुख्याने MESA गटातर्फे आयोजित असतात.

TSD(Technical Service Director) -हि MESA गटातील एक विशिष्ट जबाबदारी असणारी पोस्ट आहे . हि पदवी असणाऱ्या व्यक्तीस तांत्रिक कार्यक्रमांच्या नियोजनासोबतच , Junior  विद्यार्थ्यांच्या तांत्रिक problems च समाधानही अंशतः करावं लागतं   

 

सांगली(दिनांक २९ जुलै २०१३) - येथील वालचंद महाविद्यालयातील D-5 या वसतिगृहात MESA व Non-MESA गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. सदरच्या दिवशी मेसा कार्यकर्त्यांचा सहकारी वर्ग (Assistant  Board) दुसऱ्या दिवशी होणाऱ्या GIM (General interest Meet ) या प्रथम वर्षात यांत्रिकी विभागात  प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या  स्वागतासाठी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी तयारी करत होता . या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण contraption हा रोमहर्षक  तांत्रिक देखावा  होता . या देखाव्याची तयारी करण्यात मेसा कार्यकर्ते प्रामुख्याने पलाश बाहेती , सौरभ  देखणा , सौरभ सावंत (पाटील ) , विपुल शिराळकर (वासरू)  इत्यादी मग्न होते . त्याचवेळी विरोधी पक्षनेते शंतनू गावडे (अध्यक्ष -नॉनमेसा गट) यांचे त्याठिकाणी आगमन झाले .  त्यावेळी शंतनू यांनी मेसा च्या कार्यक्रमबद्दल विचापूस केली. पण त्यास सौरभ देखणा यांच्याकडून जे उत्तर मिळाले ते अतिशय उग्र आणि झोंबणारे असे वाटले . राग अनावर झाल्याने विरोधी पक्ष नेत्यांकडून मेसाचे TSD असणाऱ्या सौरभ देखणा याना मारहाण करण्यात आली . काही प्रयत्नानंतर आणि पोलिसांच्या दबावानंतर वादावर पडदा पडला .

            आज होणाऱ्या GIM वर सदरच्या घटनेचे सावट उमटणार अशी शंका भागातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे . GIM साठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . दैनिक वालचंद शी बोलताना MESA प्रवक्ते अभिजित बागल म्हणाले , "घडलेली घटना अतिशय खेदजनक असून त्याबद्दल मी MESA प्रवक्ता या नात्यानं दिलगिरी व्यक्त करतो . सौरभ देखणा यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. "

म.रा.प. म ( महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) अध्यक्ष श्री सौरभ सावंत यांनी संध्याकाळी ६ वाजता सांगली- जयसिंगपूर या बस मधून दिलेली प्रतिक्रिया " हि घटना जिव्हारी लागणारी असून एक सहकारी आणि गावकरी या नात्यानं मी सौरभ देखणा यांच्याबाबतीत घडलेल्या कृत्याचा निषेध करतो . नियोजित बस धरून घरी जायचं असल्याने सौरभ देखणा यास मी इस्पितळात प्रविष्ट करण्यासाठी उपस्थित राहू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व "

            काल उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार GIM अगदी शांततेत आणि सुव्यवस्थेत  पार पडली . जखमी अवस्थेत सौरभ देखणा यांनी contraption  हा देखावा अचूकपणे आणि निर्धारित वेळेत पार पाडला. त्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव पंचक्रोशीत होत आहे . शंतनू गावडे यांनी मात्र घटनाक्रमाबद्दल मौन पाळलं आहे .

                                                                                                     -तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत 

                                                                                                                                    क्ष


12 comments:

  1. अतिशय सुंदर लेखन आहे 'क्ष' जी. तो प्रसंग आज ही डोळ्यासमोर उभा राहतो. शंतनू रावांचा अचानक आघात, देखणाजींचा तितकाच हिंमतीचा विरोध, अभिजीत सरांनी वाद मिटवण्याचा केलेला प्रयत्न आणि आपण (क्ष) घेतलेला या प्रसंगाचा आनंद सगळे काही आठवणींना उजाळा देते. ��

    आपण असेच मजेशीर प्रसंग आपल्या खास लेखनशैली मध्ये लिहीत रहाल अशी अपेक्षा.��

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सौरभ सावंत (पाटील) ! मी नक्कीच याहूनही मजेशीर लेख तुमच्या भेटीस आणत राहीन .

      Delete
  2. Shantunu gavde was silent then but he can speak now about what happened, what he felt, why he did what he did. He's alive right?

    ReplyDelete
  3. पत्रकार क्ष, मस्त लिहिलं!
    Congratulations for IIM, Indore.
    Laptop aaj baghto mi ani sangto tula, baki sagla thik aahe asa apekshit karto.

    ReplyDelete
  4. Ek number fekya ������
    शांतनु गावड़े यांच्या प्रतिक्रिया काय आहे ??

    ReplyDelete
    Replies
    1. शंतनू गावडे यांच्यापर्यंत हा ब्लॉग पोहोचला नसेल कदाचित .

      Delete
  5. भारी रे 👍😂😂

    ReplyDelete
  6. अगदी पोवाडा वाचावा असे पद्धतीचे जिवंत लिखाण मित्रा... त्या खोलीत असल्याचा भास झाला... Keep it up

    ReplyDelete